विचारधारा

शैाक्षणिक वर्ष १९९७ – ९८ पासून आर . आर. एज्युकेशन ट्रस्टचे शैाक्षणिक सुरुवातझाली. त्या वेळी मराठी माध्यमाची शाळा सुरु करून सर्व प्रथम इ १ ली , इ ५ वी व इ ८ वी असे तीन वर्गाची सुरुवात करुन शिक्षण श्रेत्रात पदार्पण केले नंतर हळू हळू सर्व वर्गांना प्रवेश झाले व मराठी माध्यमाची शाळा पूर्ण पणे इ १ ली ते इ १० वी पर्यत शैाक्षणिक वर्ष १९९९ – २००० पर्यत झाली. आणि एस . एस. सी ची पहिली बँच मार्च २००० साली प्रविष्ठ झाली शाळेची सुरुवातीपासून S. S. C चा निकाल ९० ./. च्या वर राहिलेली आहे .

आर.आर.एज्युकेशनल ट्रस्ट चे मराठी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी अगदी तळा गाळातून आलेली असतात. या मुलांना संस्कार देऊन समाजात चांगले जीवन जगण्याचे मोलाचे मार्गदर्शन येथे केले जाते व या विद्यार्धाचे जीवनमान सूधारव्यात मदत होते .मार्च २००० पासून मार्च २०१८ पर्यंत एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी पास झालेले आहेत व विविध श्रेत्रात उच्च शिक्षण घेत आहेत.

शिक्षण व्यतिरिक्त विद्याथी शालेयसह – शालेयउपक्रमांत सहभागी होतात व त्या साठी शिक्षण नेहमीच त्त्यांच्या पाठीशी राहतात त्यामुळे विद्यार्थीना मानसिक बळ मिळते व यश संपादन करण्यास फार मोठे योगदान होते .